सावदा येथील मनाली हॉटेल मध्ये दारू व बियरचे बॉक्स ची चोरी
Monday To Monday NewsNetwork।
सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। येथील फैजपूर रोड वरील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबार मध्ये रात्री चोरट्यांनी दरोडा टाकून सर्व दारू व बियर चे बॉक्सेस चोरून नेल्याची घटना घडली. यात काही लाख रुपयाची दारू चोरल्या तसेच नारायण ट्रस्ट राजस्थान ची दान पेटी सुदधा चोरट्यांनी पळवून नेले .
हॉटेलच्या उत्तर बाजूस असणाऱ्या खिडकीला तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर हॉटेल मधील सी सी टिव्ही केमेरे फोडून डीव्हीआर घेऊन गेले तसेच हॉटेलमध्ये असणारे दारू आणि बीयरचे संपूर्ण बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्या. पहाटे ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली . याची माहिती मिळताच मनली हॉटेल चे संचालक मनोज नेमाडे, विनोद नेमाडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी घटनास्थळी धाव घेतली , पोलिसांना खबर दिल्याने लागलीच सावदा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले सह उमेश पाटील, संजू चौधरी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.