डोळ्यादेखत अपप्रवृत्तीच्या लोकांकडून शेत मालाचे नुकसान,वेळीच आळा बसणे गरजेचे-एकनाथराव खडसे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गेल्या दहा दिवसांपासून चिनावल शेत शिवारात शेत मालाच्या चोऱ्या व नुकसानीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत .या मुळे शेतकऱ्यांच्या वतीने सावदा येथे शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले,या पश्वभूमीवर चीनावल येथे लोकप्रतिनिधी सह पोलीस प्रशासन व शेतकरी ,गावकरी याची संयुक्त बैठक मंगळवार रोजी दुपारी १ वाजता पार पडली.
या बैठकीत पोलिसांनी धाक निर्माण करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा व जास्तीत जास्त शासन करावे, चिनावल सह परिसरात शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून शेत मालाचे लाखो रुपयांचे नुकसान केले जात आहे त्यांना अटकावं केल्यास ते अंगावर धावून येण्याचे प्रकार वाढत आहे याला वेळीच आळा बसणे गरजेचे आहे असे मत माजी मंत्रीएकनाथ खडसे यांनी या वेळी व्यक्त केले, यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, आ. राजू मामा भोळे, आ. शिरीष चौधरी, सुरेश धनके,पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे, एपिआय देविदास इंगोले, सिद्धेश्वर आखेगावकर,गणेश धुमाळ ,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, हे उपस्थित होते तर शेतकरी पंकज नारखेडे ,तंटा मुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले,रमेश पाटील,गोपाळ नेमाडे,धनंजय चौधरी, चंद्रकांत भंगाळे, चिमण धांडे,मिलिंद वयकोळे,रमेश महाजन ,चिनावल पो.पा.निलेश नेमाडे ,बापू पाटील , ठकसेन पाटील , घनश्याम बोंडे ,भरत बोंडे ,किरण नेमाडे , किशोर बोरोले ,गोपाळ पाटील,सोनजी नेमाडे,पंकज राणे,नारायण नेमाडे ,सागर भारंबे , संदीप महाजन,जितेंद्र वानखेडे ,गोडू महाजन तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
परिसरात विजेच्या तारा चोरून नेणे,स्टार्टर फोडणे वीज पंप फोडणे,फ्युज फोडणे असे प्रकार घडत असताना चोरट्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे तसेच ठिबक मोल्डिंग करणारे विजेच्या तारा केबल मधील तारा स्टार्टर चे तारा या भंगारात खरेदी करणाऱ्यांची देखील प्रशासनाने चौकशी करावी ,
आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकऱ्याची केळी चोरीला जाते , दोषींवर चौकशी करून कारवाई करावी तसेच त्यांनी सावदा पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सावदा पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या घटना घडत असताना शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण केले जात नसल्याने पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्याची गरज असल्यास ती पण करण्यात यावी असे मत आमदार राजू मामा भोळे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या भावनाचे प्रशासनाकडून आजवर दुर्लक्ष केल्याचे नमूद करत शेतकऱ्यांना कायदा हातात घेण्यास भाग पडले जाते त्यांना आधी न्याय देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने पंकज नारखेडे यांनी केली.
मी स्वतः शेतकरी पुत्र आहे,पहिल्या दिवसापासून प्रत्येक घटनेची व्यवस्थित माहिती घेऊन चौकशी केली जाईल
दोषी असेल त्याची गय केली जाणार नाही अशी ग्वाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी उपस्थितांना या वेळी दिली