भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावद्यात दोघ राष्ट्रवादीला धक्का ! ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत माजी नगरध्यक्षासह माजी नगरसेवक स्वगृही !

सावदा, ता. रावेiर .मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जसजशी नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. तसं तशी राजकारणाची समीकरणे बदलत आहे सावद्याच्या राजकारणात घडामोड घडत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटांचे नेते आ. एकनाथराव खडसे यांचे समर्थक पंकज येवले यांनी त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगरपालिका निवडणूक तोंडावर असतांना आज सावदा नगरीत मोठी राजकीय घडामोड घडली. जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज शहरात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते पंकज येवले तसेच त्यांच्या सौभाग्यवती माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता येवले तसेच माजी नगरसेवक अजय भारंबे यांनी गिरीश महाजनाच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. तसेच प्रांचक्रोशित नामवंत व्यक्तिमत्व माजी नगरसेवक नंदकुमार पाटिल यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक सुधाकर पाटील यांचे पुतणे राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नितिन पाटील यांनी स्वगृही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष एकलव्य कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते गजानन ठोसरे, मुराद तडवी, मनीष नीलकंठ पाटील आदींनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!