विज्ञानाची कास धरू या ,कवेत अवकाश घेऊ या…, विज्ञान दिन कार्यक्रमात डॉ.एस.आर.रतकल्ले यांचे प्रतिपादन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। 28 फेब्रुवारी रोजी प्रगती विद्यालय रोझोदा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान दिनानिमित्त डॉ.सी.व्ही.रामण यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी विद्यालयाचे शिक्षक श्री.विजय सुरवाडे हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एस.आर.रतकल्ले यांनी मानवाच्या प्रगतीसाठी विज्ञान हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे,म्हणून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी असे मत व्यक्त केले तर डॉ.एन. एन.लांडगे यांनी विज्ञानातील रहस्य सांगितले.दिपाली तायडे, प्रशांत तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी समूहगीत गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . प्रस्तुत कार्यक्रमास विद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम बी.एड.छत्राअध्यापक यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. तर आभार सारिका पाटील यांनी मानले.