सावदा येथे कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत ४० हजारांच्या ऐवज लंपास !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
सावदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा| येथील गौसिया नगर भागातील रहिवासी असलेले कुटुंबीय बाहेरगावी गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून जवळपास ४० हजार रूपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक असे, सोमवार दि.२६ जुलै रोजी घराला कुलूप लावून मोठा वाघोदा येथे नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमाला शहरातील गौसिया नगर मधील रहिवासी शेख जावेद शेख अबू-तालिब याच्या संपूर्ण कुटुंब गेले होते. कार्यक्रमा अपटून सावदा येथे परत आल्यानंतर त्यांच्या राहत्या घराचे दरवाजेवरील कुलूप तुटलेल्या अवस्थेत प्रथम दर्शनी दिसून आल्याने सदरील घर मालक घराच्याआत गेल्यानंतर कपाट उघडलेल्या अवस्थेत होती आणि कपाट मधील लाकर तोडून त्यातील ठेवलेले जवळपास ४० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी उचलून अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप तोडून सदरची रक्कम वर हात सफाई केली. सावदा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची पंचनामा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.