Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसावदा

सावदा पोलीस स्टेशनतर्फे ‘शोध स्वतःचा, वेध भविष्याचा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

सावदा, ता. रावेर, जि. जळगाव. मंडे टु मंडे न्युज ||सावदा पोलीस स्टेशन, जळगाव यांच्या वतीने तरुणांना योग्य दिशा मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘शोध स्वतःचा, वेध भविष्याचा’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानासाठी प्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. गणेशजी शिंदे हे उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांनी स्वतःमधील क्षमता ओळखून सकारात्मक विचार, जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन गुरवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता, कुलसुमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय आणि लॉजिंग , सावदा येथे करण्यात आले आहे.

या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व तरुणांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळणार असून, करिअर निवड, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील ध्येय निश्चित करण्यासाठी मोलाचे मार्ग

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!