भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

अतिक्रमण हटवून रस्त्याचे रूंदीकरण करा:पाल ग्रामस्थांचे सा.बां.विभाग सावदा येथे आंदोलन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील पाल गावातून जात असलेल्या आमोदा – भिकनगाव रस्ता राम क्र.४५ या रस्त्यावरील असलेले अतिक्रमण हटवून रस्त्याचा रुंदीकरण व्हावा तसेच गटारी देखील व्यवस्थित बांधण्यात यावे. या मुख्य मागणीचा निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा सह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दि. २० सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रानुसार सावदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आज दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी पाल येथील नागरिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.

तसेच सदरील हायब्रीड अन्यूटी तत्वावर पॅकेज क्रमांक एन एस के ७२ भिकनगांव आमोदा, सावदा, खिरोदा, पाल ते मध्यप्रदेशच्या हद्दीपर्यंत तयार केला जात असून फक्त पाल वगळता संपूर्ण रस्ता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी असलेले अतिक्रमण हटवून संबंधित प्रशासनामार्फत केला जात आहे. मात्र सातपुड्याच्या कुशीत बसलेल्या व नैसर्गिक रित्या पर्यटन स्थळ असलेल्या पाल गावातून सदरील रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण न हटवता जैसे थे स्थितीमध्ये बांधला जात आहे यामुळे सांडपाण्याचा निचरा साठी गटारी सुद्धा बांधण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे परिणामी सदरील होत असलेल्या विकासापासून पाल येथील नागरिक वंचित ठरलेले आहे.

म्हणून पाल येथील रस्त्याच्या कडेला असलेले अनधिकृत सर्व अतिक्रमण काढून रस्ता संपूर्णपणे रुंदीकरण होऊन मिळावा तसेच गावातून जाणारा सांडपाणी बाबत गटारी बांधून निचरा होऊन मिळावा. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व गटारीसाठी अडथळा बनलेल्या अतिक्रमण हटवण्याबाबत कोणी व्यक्ती आडवा येत असेल तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी. व पाल येथे रोड टच असलेले अनधिकृत अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा यांनी पोलिसांची मदत घेऊन हटवावे. तसेच सनदशीर मार्गाने आम्हाला न्याय न मिळाल्यास यापुढे जिल्हा व्यापी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात उल्लेख केलेला असून त्यावर विकास खेमासिंग चव्हाण, धनराज उदयसिंग पवार, पंडित पुन्हा चव्हाण, राजू लखा राठोड, गणेश रघुनाथ चव्‍हाण, जिया बाबू लतीफ तडवी, सह जवळपास १२० लोकांच्या सह्या आहेत. परिणामी रस्त्यावरील अतिक्रमणे योग्य भूमिका घेतली जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना सहाय्यक अभियंता बी.एन.शेख यांनी दिले. सदरील आंदोलनावेळी सावदा एपीआय देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, सह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!