यावल शहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल शहरातील ख्वाजा नगर मध्ये २९ हजार ५८८ रूपयांचा मानवी आरोग्यास हानिकारक असलेला विमल गुटखा व सुगंधित पानमसाला छापा टाकून जप्त करण्यात आला असून शेख फारुख शेख युसुफ यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना, आरोग्यास हानिकारक असलेल्या विमल गुटखा व सुगंधित तंबाखू यावल शहरातील ख्वाजा नगर मध्ये अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता, पोलिसांनी तेथे छापा टाकून ख्वाजा नगरातील शेख फारुख शेख युसुफ यांचेकडे छापा टाकून त्याचे कडून विमल गुटख्याची २० रुपये किमतीची १५० पाकिटे व सुगंधी तंबाखू असा २९ हजार ५८८ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे,हेका उमेश सानप,वशिम असलम तडवी यांनी केली.