रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दुसरा भिडू, रावेरचे दारा मोहमद मैदानात, नाना पटोलेंच्या दरबारी
रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर यावल विधानसभा मतदार संघात उमेदवारी मिळण्यासाठी कांग्रेस मध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असल्याने वेगवेगळ्या पक्षांसह उमेदवार सुद्धा तयारी करत असून उमेदवारी साठी आपापली फिल्ड्डींग लावत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
रावेर चे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहमद जफर मोंहमद यांनी रावेर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे कडे मागणी करत पत्र दिले आहे.
रावेर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहमद जफर मोंहमद यांनी कांग्रेस कडे उमेदवारी मागितल्याने रावेर विधानसभा मतदार संघात कांग्रेस मध्ये अल्प संख्यांक मतदारांना गृहीत धरणारांसाठी ही मोठी चपराक आहे.
रावेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहमद जफर मोंहमद यांची मतदार संघात मोठी पकड असून त्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. या वेळी त्यांचे सोबत मा. जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष राजीव पाटील , इंटक चे भगतसिंग पाटील, रावेर तालुका कॉग्रेस चे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक जिल्हा मा. अध्यक्ष अविनाश भालेराव , किरण पाटील ,डॉ अनिल शिंदे, नगर सेवक आसिफ मोहम्मद आणि अनेक कॉग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्तो उपस्थित होते. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी पाहून आगामी विधान सभा निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.