गुंगीचं औषध देऊन महिला पोलिसावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा लैंगिक अत्याचार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिला पोलिसाला चहातून गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर आरोपी अधिकाऱ्याने अश्लील फोटो काढून गेल्या पाच वर्षांपासून पोलिस अधिकारी लैंगिक अत्याचार करीत असल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. ही घटना नवी मुंबईच्या पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात पोलिस उप निरीक्षकाविरुद्ध बलात्कारासह अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भांत मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२० मध्ये आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने चहा पिण्याच्या बहाण्याने पीडितेला पनवेल मधील नेरे येथील आपल्या भावाच्या खोलीवर नेले होते. त्या ठिकाणी आरोपी पोलिस उप निरीक्षकाने चहात गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या वेळी आरोपी पीडिते सोबत शरीरसंबंध ठेवतानाचे खासगी फोटो देखील आरोपीने काढले.
त्यानंतर आरोपी गेल्या पाच वर्षांपासून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तसेच लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी लैंगिक अत्याचार करीत आहे. आरोपी एवढ्यावर थांबला नाही तर त्याने पीडितेला आक्षेपार्ह फोटो तिच्या मुलाला दाखवण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडून पाच लाख रुपये उकळले. आरोपी पोलिस उप निरीक्षक आणि त्याच्या आईने पीडितेला जातीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप देखील महिला पोलिसानं केला आहे. या प्रकरणी नवी मुंबई मधील पनवेल पोलीस स्टेशनला आरोपी पोलिस उप निरीक्षक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.