भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईमजळगाव

कुजलेल्या अवस्थेत मानवी कवटी आणि हाडे सापडल्याने खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अमळनेर तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत गुरख्याला कवटी व हाडे दिसून आल्याने खळबळ उडाली. गेल्या अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथून हरविलेल्या महिलेचा हा मृतदेह असण्याची दाट शक्यता अमळनेर च्या पोलीस तपासातुन दिसत आहे. घटनास्थळी हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड, कपडे भरलेली बॅग आणि चांदीचे जोडवे आढळून आले आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस पुढील तपास करीत आहे.

अमळनेर तालुक्यातील जानवे जंगलात बकऱ्या चारणाऱ्या गुरख्यांना एक कवटी, काही हाडे दिसून आली. सदर प्रकाराची माहिती अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना मिळताच ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या परवानगीने फॉरेन्सिक पथक बोलावून घेतले. घटनस्थळवरून हाडे, केस, वस्तू व काही नमुने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, वैजंताबेन भगवान भोई (वय ५०, रा. कुबेरनगर, कतार गाम दरवाजा,सुरत) या महिलेचे आधार कार्ड घटनास्थळी आढळून आले. तसेच कपड्याने भरलेली बॅग व चांदीचे जोडवे वैजताबेन ही महिला दि. १७ मे २०२५ पासून बेपत्ता झाली होती. सुरत येथे बाजारपेठ पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तूर्त अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेऊन तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!