भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरशैक्षणिक

ऐनपूर महाविद्यालयात विधी सेवा शिबिर संपन्न, २६ रक्त दात्यांचे रक्तदान

ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती आणि रावेर तालुका वकील संघ रावेर व सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत विधी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये विविध स्टॉल्स लावण्यात आले जसे आधार कार्ड अपडेटशन, कृषी विभागामार्फत विविध योजनांची माहिती, डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांना साठी विविध ॲप च्या माहिती चे स्टाल्स लावण्यात आले.आरोग्य विभागामार्फत रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले २६ रक्त दात्यांनी रक्त दान केले. शिबिराचे अध्यक्ष श्री पी एच बनसोड साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जळगाव यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विजय व्ही जटाळ साहेब अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर रावेर यांनी न्यायालयाच्या कामकाजा विषयी माहिती सांगितली. शिबिराचे प्रमुख वक्ते अॅडवोकेट तुषार माळी रावेर यांनी पोक्सो कायद्याविषयी माहिती सांगितली.अॅडवोकेट किशोर पाटील रावेर यांनी एससी एसटी ॲक्ट अँड प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट याविषयी माहिती सांगितली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले.

या शिबिराला पोलीस निरीक्षक विशाल पाटील सावदा पोलीस स्टेशन ,सावदा, पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे निंभोरा पोलीस स्टेशन, निंभोरा, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील, तहसीलदार बी ए कापसे तालुका कृषी अधिकारी वारके , ॲड सुरज चौधरी अध्यक्ष तालुका वकील संघ, ॲड उदय सोनार सचिव तालुका वकील संघ, ऐनपूर गावाचे सरपंच अमोल महाजन तसेच निंबोल,विटवा, खिर्डी या गावांचे सरपंच, तलाठी, ग्राम विस्तार अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच या शिबिराला वकील, पत्रकार, शेतकरी प्राध्यापक, संस्थेचे चेअरमन श्रीराम पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, सचिव संजय पाटील व सर्व संचालक मंडळ व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी ऐनपूर ग्रामपंचायतचे तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष काशिनाथ शामू पाटील यांनी उत्कृष्ट तंटामुक्ती चे कार्य केल्याबद्दल व ऐनपूर गावाचे माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद अवसरमल यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय भूषण पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. शेवटी शिबिराला उपस्थित मान्यवरांचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जयंत नेहेते यांनी केले.शेवटी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!