खळबळजनक : एकाच कुटुंबातील पती – पत्नी सह दोन मुलांची आत्महत्या
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलीनाही. एकाच कुटुंबातील पती – पत्नी व दोन मुलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ही घटना धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात घडली. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याच्या या भयंकर घटनेने धुळे जिल्हा हादरुन गेला आहे.
धुळ्यातील गिरासे कुटुंबातील दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी भागातील ही घटना आहे. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं शेजारच्यांना खोटं सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, वय ४८ वर्ष. गीता प्रवीण गिरासे वय ४४ वर्ष आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे, वय १८ वर्ष. सोहम प्रवीण गिरासे वय १३ वर्ष.असं मृतांची नावं आहेत.
चौघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नसल तरी यात प्रवीण गिरासे यांनी गळफास घेतल्याची तर इतरांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळत आहे.आत्महत्येचा . हा प्रकार उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कुटुंबाने इतका टोकाचा निर्णय का घेतला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आत्महत्या प्रकरणी पोलिसात नोंद झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास धुळे पोलीस करत आहेत.