क्राईमचाळीसगाव

तोंड दाबून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तोड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून समोर आली. या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून २६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये दत्तू दिलीप मोरे (रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव) यांने पीडित मुलगी ही एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्या राहत्याY घरात तिच्यावर अत्याचार केला आहे. तसेच इतर दिवशी देखील शेतात आणि इतर भागात देखील धमकी देऊन अत्याचार केला.

पीडित अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला असता पोलिस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली. यानुसार या घटनेबाबत शनिवारी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दत्तू दिलीप मोरे. रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव. यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!