लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तरुणीवर लैंगिक अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात १५ मे गुरूवार रोजी उघडकीस आला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये एका २४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुणी जळगाव शहरात आपल्या कुटुंबा सह राहते. दरम्यान सदर तरुणीची हरी विठ्ठल नगर मध्ये राहणारा सनी प्रमोद उमक, वय २४ वर्ष. याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीनंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दरम्यान सनीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
अत्याचारानंतर तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता सनीने लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीने अखेर एमआयडीसी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार गुरुवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजता सनी उमक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.