अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेऊन तिच्यावर जबरजस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. अमळनेर शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका परिसरात तिच्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संदर्भात बुधवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता अंमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अमळनेर शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबीयांसह वास्तव्याला असून मंगळवार १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता अन्नू नारायण साळुंखे (पारधी) (रा. अमळनेर) याने पीडित मुलीला फोन करून भेटण्यास बोलविले. त्यानंतर त्याने तिला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या घटनेसाठी आरोपीला गण्या उर्फ गणेश नाना साळुंखे (पारधी) याने सहकार्य केले. दरम्यान हा प्रकार घरी आल्यानंतर पिढीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार नातेवाईकांसह तिने अमळनेर पोलिसात दोघां विरोधात फिर्याद दिली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून बुधवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता अन्नू नारायण साळुंखे (पारधी) आणि गण्या उर्फ नाना साळुंखे (पारधी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.


