सोन्याचा भाव घसरला, स्वातंत्र्यदिनी ग्राहकांना दिलासा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सोन्याच्या दराने लाखांच्या वर भाव खाल्ला असून दिवसेंदिवस सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असताना अशातच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मात्र घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सराफ बाजारात सोन्याचा दर १ लाख ४ हजारापर्यंत पोहोचला होता. मात्र या आठवड्यात सोने दरात घसरण दिसून आली. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोने खरेदी करण्याची मोठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
आज शुक्रवार रोजी स्वातंत्र्य दिन असून सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,२४० रुपये आहेत. ८ कॅरेट सोन्याचे दर ८०,९९२ रुपये आहेत.
सोबतच २२ कॅरेट सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले आहे. प्रति तोळ्याचे भाव ९२,८०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,२४० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,२८,००० रुपये आहेत. या दरात १००० रुपयांची घसरण झाली आहे.


