भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावशैक्षणिक

शालार्थ आयडी घोटाळा : जिल्ह्यात ६६१ कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशाची नोंदच नाही ! काही नोंदींत खाडाखोड

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शालार्थ आयडी घोटाळा उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. शालार्थ आयडीचा घोटाळा उघड झाल्यानंतर आता नवनवीन गोष्टी उघड होत आहेत. २९४ कर्मचाऱ्यांचे आदेशाच्या नोंदी आहेत मात्र, नस्त्या मिळत नाहीत. तर जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६६१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. यात अनेक नवनवीन बाबी समोर येत आहेत. त्यातच जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आगामी काळात अजून वाढण्याची शक्यता आहे.

पडताळणी मध्ये शिक्षण विभागाच्या कार्यालयातील मूळ जावक रजिस्टरची पडताळणी केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या आदेशांवरील जावक क्रमांक, दिनांक, कर्मचारी व शाळेची नावे अधिकृत नोंदींशी जुळत नसल्याचे उघड झाले आहे. तपासणीत संबंधित शाळांकडून या कर्मचाऱ्यांचे शालार्थ आदेश डिजिटलायझेशन प्रणालीवर अपलोडच करण्यात आले नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

नोंदींत खाडाखोड
शालार्थ आदेशांची कार्यालयातील मूळ जावक रजिस्टरशी पडताळणी केली असता जावक क्रमांक, दिनांक तसेच कर्मचारी व शाळेच्या नावांच्या नोंदी जुळत नसल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी रजिस्टरमध्ये खाडाखोड करून नोंद केली आहे.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
बनावट शालार्थ आदेश तयार करून तो खरा असल्याचे भासवून अनेक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ ड्राफ्ट अप्रव्ह करून शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन तयार करून सुनियोजित कट कारस्थान करून संघटीतपणे बेकायदेशीर कृत्य करून संबंधित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षण संस्थेचे प्राधिकृत पदाधिकारी, तत्कालीन शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी ती मंजूर करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केली आहेत,

जिल्ह्यातील तब्बल ६६१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली असून त्याच्या आदेशाची जावक मध्ये नोंदच नसल्याचे ही समोर आले आहे. तर २९४ कर्मचाऱ्यांचे शालार्थ आदेशाचे जावक क्रमांक व दिनांक, तसेच कर्मचाऱ्यांचे नाव व शाळेचे नाव आदी नोंदी कार्यालयाच्या मूळ जावक रजिस्टरशी जुळून येतात. मात्र, त्यांचे शालार्थ नस्त्या कार्यालयात आढळून येत नाहीत. तरी याप्रकरणी कार्यालयातील अभिलेख्यांची पुन्हा पाहणी करून, तसेच संबंधित संस्थेची, शाळेची व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यानंतर शालार्थ आदेश योग्य की अयोग्य, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

तपासणी अद्याप सुरूच
काही प्रकरणांमध्ये शिक्षण उपसंचालकांकडून कागदपत्रांची तपासणी अद्याप सुरू असल्याचा शेरा अहवालात नमूद केला आहे. विविध शैक्षणिक संस्थांमधील नियुक्ती आदेश, शालार्थ ड्राफ्ट, संबंधित कागदपत्रे व अधिकृत नोंदींची पडताळणी करण्यात आली. यात अनेक तफावती आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!