शेठ ला.ना.सा.विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी 7 ते 10 या वेळेत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती प्रमुख अतिथी सामाजिक समरसता मंचचे कार्यवाह सुरेश कुलकर्णी सर,शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडेसर, उपमुख्याध्यापक संजय भारुळे सर, जेष्ठ पर्यवेक्षक प्रशांत जगताप सर. संजय वानखेडे सर, जेष्ठ शिक्षिका सौ. आशा कुलकर्णी मॅडम,शालेय विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी यांचे हस्ते देवी सरस्वती व विश्वभूषण,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्ल्यारपण करण्यात आले.या प्रसंगी प्रास्ताविक बापू पाटील सर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.या वेळेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर शालेय विद्यार्थी कु.नेहा नेरकर, कु.श्रद्धा जैन ,गौरव पगारे,कुमुद चव्हाण यांनी मराठी, हिंदी,इंग्रजीत मनोगत व्यक्त केले तर शिक्षक पांडुरंग सोनवणे सर यांनी स्वरचित भीम वंदना सादर केली. मयूर पाटील सर, पंकज महाले सर यांनी भीमगीत सादर केले.यावेळेस शिक्षक संजय वानखेडे सर, आनंद पाटील सर, हितेंद्र जोशी सर, सौ.कविता कुऱ्हाडे मॅडम,श्रीमती योगिता महाजन मॅडम यांनी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक , राजकीय , कृषिविषयक कार्याची माहिती सांगितली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी सुरेश कुलकर्णी सर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव संबोधण्याचे महान कार्य विषद केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सचिन देशपांडे सर यांनी डॉ.आंबेडकर यांच्या विविध गुणांची माहिती माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्यासारखे गुणवंत होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संपदा तुंबळे यांनी तर आभारप्रदर्शन सौ. वृषाली पाटील यांनी केले.तर समारोप वंदेमातरम गीताने करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता सहावी चे सर्व वर्गशिक्षक तसेच उल्हास ठाकरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.