भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

आता शेत रस्ता, पाणंद रस्ता मोजणी होणार मोफत, मोजणी फी रद्द, राज्य शासनाचा मोठा निर्णय

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने पाणंद व शेतरस्ता मोजणीसाठी आकारली जाणारी फी रद्द केली असून आता ही मोजणी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतरस्त्यांवरून अनेक वेळा शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात, पावसाळ्यात तर या समस्या वाढतात. अशा वेळी या आधी भूमी अभिलेख विभागाकडून रस्ता मोजणीसाठी फी भरावी लागत होती. मात्र ही फी कोणी भरावी या वरूनही वाद होत होते. मात्र आता रस्ता मोजणी साठी फी भरावी लागणार नाही. मोजणी फी रद्द झाल्याने, शेतातील रस्ता मोजणी मोफत केली जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून शेतरस्ता मोजणी फी रद्द झाल्याने अनेक प्रलंबित वाद मिटू शकतात.

ट्रॅक्टर, बैलगाडी, किंवा अन्य वाहने शेतात नेण्यासाठी रस्ता आवश्यक असतो. रस्त्यावर अतिक्रमण झाल्यास अडचणी निर्माण होतात. अशावेळी रस्ता मोजून त्याची हद्द निश्चित करावी लागते. आता ही प्रक्रिया मोफत असेल.

उन्हाळ्यात शेतात जाणे सोपे असते, पण पावसाळ्यात फक्त निश्चित रस्त्यांद्वारेच जाणे शक्य होते. जर कोणी रस्ता अडविला असेल, आणि तो रस्ता नकाशावर दर्शवलेला असेल, तर शेतकरी तहसीलदारांकडे अर्ज करून कायदेशीररित्या तो रस्ता मोकळा करू  शकतो.

कधी कधी शेतात जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसतो. अशा वेळी महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार तहसीलदारांकडे नवीन रस्त्याची मागणी करता येते. या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नवा मार्ग मिळू शकतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!