मुक्ताईनगरसामाजिक

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुक्ताईनगरला श्री संत ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्थेचा स्थलांतर सोहळा

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, प्रतिनिध .अक्षय काठोके | मुक्ताईनगर येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री संत ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्थेचा स्थलांतर सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दि. ३० मार्च रोजी पार पडणार आहे.

याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या २३ वर्षापासून अविरत सेवेत असलेली अग्रेसर पतसंस्था म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा नूतन प्रशस्त जागेत रविवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्थलांतरण सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यास केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आ. चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, संत मुक्ताबाई देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, मंडे टु मंडे न्युज चे संपादक तथा मा. नगरसेवक भानुदास भारंबे, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. जगदीश पाटील, उद्योजक विनोद सोनवणे या सह विविध मान्यवर व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाचे पत्रकार उपस्थिती लाभणार आहे तरी सर्वांनी सोहळ्यासाठी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!