धक्कादायक : ट्रेनमध्ये ५५ वर्षीय महिलेवर बलात्कार
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये ५५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत वांद्रे स्टेशनवर घडली. या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. प्लॉट फार्म वर या वेळी कोणीही रेल्वे कर्मचारी अथवा पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हते.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, ५५ वर्षीय महिला १ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री हरिद्वारहून येऊन तिच्या नातेवाइकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरली. तिचे सोबत असलेले तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले होते. सदर महिला लांबून प्रवास करून आल्याने थकून गेली होती. म्हणून ती प्लॅटफॉर्म थोडा वेळ झोपली होती. मात्र झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन झोपली.
दरम्यान, पीडित महिला ट्रेन मध्ये गेल्याचे त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने पाहिले. थोड्या वेळाने तो हमाल आत ट्रेनमध्ये शिरला आणि तिच्यावर बलात्कार करून हमाल तिथून पसार झाला. नातेवाईक आल्यावर नातेवाईकांना तिने घडलेली घटना सांगितली.
पिडीत महिलेच्या नातेवाईकाने लागलीच रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून या बाबत तक्रार केली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे हमालाचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.