भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

धक्कादायक : रावेर तालुक्यात तिघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सावदा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात दोन वर्षाच्या चिमुकली पासून तर चार वर्षं, सहा वर्षीय, दहा वर्षीय इतकेच नव्हे तर ७० वर्षीय वृद्ध महिलेवर सुद्धा बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या. अशीच आता रावेर तालुक्यातून एक घटना समोर आली आहे. रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशन हद्दीत सावदा पोलिस स्टेशन च्या दोन किलोमीटर अंतरावर एका वय अंदाजे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यातील दोघांना न्यायालयात हजर केले असून त्यांना न्यायालयाने ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून एक आरोपी अल्पवयीन विधिसंघर्शीत बालक असल्याने त्यास बाल न्यायालयात हजर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा – मस्कावद रोड वरील एका शेतात तिघांनी मामाच्या गावची ओळख असल्याचा  फायदा घेत तुला घरी सोडून देतो असे सांगून सावदा – मस्कावद शेत शिवारात सावदा – मस्कावद  दरम्यान फुस लाऊन अल्पवयीन पिडीत मुलीचा विनयभंग करत तिच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. या बाबतची तक्रार पिडीत मुलीच्या आईने सावदा पोलिस स्टेशनला केली. या बाबत सावदा पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. रेड्डी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री नखाते यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोलीस उप निरीक्षक अमोल गर्जे व पोलीस स्टेशन कडील पथक यांनी गतीमान हालचाल करून अवघ्या ३ तासाच्या आत २ संशियीत आरोपी व १ विधी संघर्षित बालक याना ताब्यात घेतले. त्यात आरोपी बंटी उर्फ आरिफ तडवी व बंटी उर्फ किरण मेढे व तिसरा बाल आरोपी रा. सावखेडा तालुका रावेर या तिघा संशयिताना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!