भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

खळबळजनक : कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पित्यानेच केला मुलाचा खून

जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पित्याने कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना २२ जून रोजी सकाळी जामनेर तालुक्यातील फत्तेपूर जवळ असलेली कसबा पिंप्री येथे उघडकीस आली. शुभम धनराज सुरळकर (वय २५) याचा मृतदेह गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शे. करीम शे. रऊफ यांच्या शेताजवळ आढळून आला.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील पोलीस पाटील समद तडवी यांनी याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांना या संदर्भात माहिती दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेत घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली असता शुभमच्या डोक्याला जबर मार झाल्याचे आढळले. तसेच, मृतदेह इतरत्र मारून येथे आणून फेकल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर याची माहिती पाचोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पथक तयार करुन वेगवेगळ्या दिशेने तपास करण्यास सुरवात केली. या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक डोमळे यांच्यासह कर्मचारी, श्वानपथक व न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

कौटुंबिक वादातून पित्यानेच खून केल्याचा अंदाज व्यक्त करत त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला व घटनेचा धागा गवसला, मृत शुभम याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो किरकोळ कारणावरून घरात सातत्याने भांडण करायचा त्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्याच्या त्रासाला संपूर्ण कुटुंबीय कंटाळले होते दि. २१ जूनच्या रात्री तो घरात झोपलेला असताना त्याचे वडील धनराज सुपडू सुरळकर यांनी रागाच्या भरात मोठा दगड त्याच्या डोक्यात टाकला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मुलाचा मृतदेह गावापासून १ किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला. तपासात आरोपी निष्पन्न झाल्याने धनराज सु-रळकर यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!