धक्कादायक : मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध ताडी विक्री केंद्र अद्यापही सुरूच? पोलीस प्रशासनासह इतर विभागाचे दुर्लक्ष?नागरिकांचे आरोग्य धोक्यात?
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके | मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात अवैध बोगस ताडी विक्री होत असून जीवाशी खेळणारा हा प्रकार होत आहे. नेमकी ताडी कुठे बनवली जाते व कुठल्या स्वरूपात कशा प्रकारे बनवली जाते हा प्रकार अद्यापही गुलदस्तात आहे.ताडी पिणारे व्यक्ती जर एक दिवस ताडी नाही पिली तर त्याचे शरीराचे अवयव शरीराच्या मधून ताणले जात असून त्याला नाईलाजाणे बोगस ताडीचे सेवन करावे लागते.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.
काही सुज्ञ नागरिकांचे असे म्हणणे आहे की म्हशीच्या प्रजननाच्या वेळेस जी इंजेक्शन अथवा गोळ्या दिल्या जातात त्या इंजेक्शनचा व गोळ्यांचा वापर या ताडीमध्ये केला जातो जर अशी ताडी कित्येक नागरिक पीत असेल तर यामध्ये नपुसंकतेचा सुद्धा प्रकार काही दिवसांनी नागरिकांमध्ये आढळून येण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही? तर असे बोगस ताडी विक्री होत असेल तर प्रशासन याकडे लक्ष देतील का व अन्न -औषध विभागातील अधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन बोगस ताडीचे दुकान बंद करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे……..
……सविस्तर बातमी पुढील अंकात (3)………..

