आरोग्यक्राईमबुलढाणा

धक्कादायक : शिवभोजन केंद्रातील जेवणा मधील वरण, भाजी मध्ये आढळल्या अळ्या

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l माफक दरांमध्ये गरजूंना चांगले भोजन मिळावे या हेतूने राज्यात शासनाकडून शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. मात्र या शिवभोजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या खामगावमध्ये समोर आला आहे. या बाबत संताप व्यक्त केला जात असून अशा प्रकारे गलिच्छ भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टा तर उडवली जात नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शासनाकडून शिवभोजन थाळी माफक दरात म्हणजेच १० रुपयात गरिबाना पोटभर जेवण उपलब्ध करून दिली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथील उपसामान्य रुग्णालयाच्या बाजूला शिवभोजन केंद्र सुरु आहे. या केंद्रावरील देण्यात येणाऱ्या थाळीमध्ये अळ्या निघाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मात्र अशा पद्धतीने नागरिकांनी घेतलेले जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याचे समोर आल्याने शिव भोजन केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जेबाबत संताप व्यक्त केला जात असून गरिबांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने या वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वरण आणि भाजीमध्ये अळ्या
शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना जी थाळी दिली जाते. अन्नामधील वरण व भाजीमध्ये मृत अळ्या असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली. हा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या खामगावमध्ये उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात शिवभजन केंद्रामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकिस आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!