धक्कादायक : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल, जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या आठ महिन्यांपासून वेळोवेळी एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक २८ जून रोजी जळगाव शहरातील जुने जळगाव भागात उघडकीस आला असून या प्रकरणी गुरुवार दि . ४ जुलै रोजी पिडीत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरुन एका परप्रांतीय २० वर्षीय तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलाच्या घराजवळ वीस वर्षीय संशयित आरोपी भाड्याच्या घरात राहात असून संबधित युवकाने पिडीत मुलाचे काही फोटो मोबाईलमध्ये घेतले होते.त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत, संबधिताने अल्पवयीन मुलावर गेल्या ८ महिन्यांपासून वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य केले.
त्यानंतर पिडीत मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे अकांऊट तयार करुन व्हायरल केले. त्यानंतर २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलाच्या आईच्या तक्रारीवरून गुरुवारी परप्रांतीय तरुणावर शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करीत आहेत.