…असे काही तरी घडू शकते…. जावई प्रांजल खेवलकर यांच्या रेव्ह पार्टीवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया …
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पुणे शहरातील उच्चभ्रू वस्तीतील खराडी येथील एका प्लॉट मध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीने राजकारणात मोठा भूकंप आला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. . एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले.
या घटने नंतर एकनाथ खडसे काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या. आणि शेवटी खडसे हे माध्यमांच्या पुढे आले असून त्यांनी म्हटले की, सध्या ज्याप्रकारे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काही घडू शकते, असा अंदाज मला अगोदरपासून होता. मी फारसं बोलणार नाही. पण अलिकडे पुण्यात ज्याकाही घटना घडल्या आहेत, ते मी फक्त चॅनलवरून पाहिले.
ते पोलिस स्टेशनमध्ये असल्याने माझं त्यांच्याशी प्रत्यक्ष अजून काही बोलणे होऊ शकले नाहीये, पोलिसांच्या ताब्यात आहेत. माझं याबद्दल म्हणणे आहे की, जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीमध्ये आमचे जावई त्याठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्याठिकाणी त्यांच समर्थन करणार नाही. पण पोलिस यंत्रणेने याठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा
कारण बऱ्याचदा असे होते की, पोलिस काहीही करू शकतात, अशी भावना जनमाणसांमध्ये आहे. त्या प्रकरणात नीट फ्रॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजेत, ब्लॅड रिपोर्ट आले पाहिजेत आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं चुकीचं राहिलं. नंतरही मी पत्रकार परिषद घेईल. आपण हे देखील बघितले पाहिजे की, हे प्रकरण कशापद्धतीने घडवले जातंय किंवा घडले. पण तथ्थ समोर येईल.
या प्रकरणा मध्ये जावई असो किंवा अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे. पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सहन केले जाणार नाही आणि निश्चितपणे याचा विरोध करू, असे खडसेंनी म्हटले आहे.


