आ. अमोल जावळे यांच्या पुढाकारातून बहुप्रतिक्षित विरोदा ते रिधुरी रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात
लाडक्या बहिणींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
विरोदा. ता. यावल मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी |
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर विरोदा ते रीधुरी या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन आज परिसरातील लाडक्या भगिनींच्या हस्ते उत्साहात पार पडले.या विकासकामामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षापासून स्थानिक ग्रामस्थांची सदर रस्त्याची प्रमुख मागणी होती आजच्या या भूमिपूजनामुळे ग्रामस्थांच्या अपेक्षांना मुहूर्त स्वरूप आले आहे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती खड्ड्यांनी भरलेल्या या मार्गामुळे परिसरातील लोकांना दैनंदिन प्रवासात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते शेतमाल वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता तसेच विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज साठी जाणे अवघड बनले होते हा रस्ता परिसरातील जीवन वाहिनी ठरणार आहे या रस्त्यास मंजुरी मिळण्यासाठी आमदार . अमोल भाऊ जावळे यांनी हा मुद्दा शासन दरबारी जोरकसपणे मांडत सातत्याने पाठपुरवठा केला त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येत रस्त्यास आवश्यक निधी मंजूर झाला आणि आज या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा 124 वा प्रेरणादायी संवाद (मन की बात) या लोकप्रिय कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला या प्रेरणादायी संवादात विरोदा येथून सहभागी होण्याची संधी लाभली देशाच्या प्रगतीचा मार्ग सामान्य जनतेच्या सहभाग करूनच मजबूत होतो यावर प्रधानमंत्री मोदीजींनी भर दिला
यावेळी आमदार. अमोल भाऊ जावळे व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी ,कार्यकर्ता बंधू भगिनी आणि गावकरी पदाधिकारी महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट जाणवत होता तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. “सामान्य माणसाच्या अडचणींना केंद्रस्थानी ठेवून काम करणे हाच माझा संकल्प आहे” असे प्रतिपादन आमदार अमोल भाऊ जावळे यांनी यावेळी केले.
या भूमिपूजन सोहळ्याला शरद महाजन, नारायण चौधरी, आर. जे. पाटील, सचिन पाटील, भरत महाजन, गणेश नेहते, नरेंद्र नारखेडे, उमेश पाटील, जयश्री चौधरी, उमेश बेंडाळे, सागर कोळी, पिंटू तेली, डॉ. नरेंद्र कोल्हे, चिंतन जैन, भरत पाटील, किशोर पाटील, मछिंद्र चौधरी, जीवन तायडे, विनोद झाल्टे, पंकज बऱ्हाटे, पूनम चौधरी, मीना बाई बऱ्हाटे, देवयानी चौधरी, तिलोत्तमा चौधरी, रूपाली सोनवणे, अमोल वारके, सतीश बऱ्हाटे, सतीश चौधरी, वसीम पिंजारी, कमलाकर चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र खाचणे, योगेश चौधरी, दिलीप चौधरी, चंदू वारके, मुकेश कोळी, लीलाधर चौधरी, प्रकाश कपले, नंदू सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
