राजीव गांधीं खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार!
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजीव गांधीं खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललंत आता मेजर ध्यानचंद पुरस्कार यांच्या नावाने पुरस्कार नाव ठेवण्यात आले आहे. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्याची घोषणा केली. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये 13 गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे 1936 मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी 39 गोल केले होते. देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचे नाव देणेच योग्य आहे असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान १९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस आहे.