ऐनपूर प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन
ऐनपूर ता.रावेर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l ऐनपूर ता.रावेर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदीर,ऐनपूर या शाळेत २६ डिसेंबर गुरुवार रोजी शाळेत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्रीराम पाटील व संचालक कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे व्यवस्थापक आर.टी..महाजन, मुख्याध्यापक अक्षय पाटील, किरण चौधरी, आयुष चौधरी आदी उपस्थित होते.
या स्पर्धामध्ये क्रिकेट, खो-खो, लिंबू चमचा, सुईत दोरा ओवणे,केळी तोडणे,रिंग अडकविणे, स्लो सायकल,फुगे फोडणे,धावणे, संगित खुर्ची, चित्रकला,रांगोळी,सुंदर हस्ताक्षर अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या स्पर्धामध्ये विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.व आम्ही उद्याच्या भारताचे नागरिक फिट आहोत याची त्यांनी जाणीव करून दिली.या स्पर्धामध्ये प्रथम,द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थांची निवड करण्यात आली.तसेच या स्पर्धामध्ये सर्व सहभागी विद्यार्थाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
तसेच या स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी निकिता चौधरी, जयश्री सराफ, कल्याणी शिंदे, अश्विनी चौधरी,अनिता महाजन, कविता बोदडे, कविता बोदडे, काजल धनगर,चंदा महाजन, योगिता शिवरामे, जाईबाई मावळे, सुनंदा पाटील यांनी परिश्रम घेतले.