भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

जळगाव वन विभागात खळबळ : वनपालाला साडे सात हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | बिल काढून देण्यासाठी ७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना चाळीसगाव येथील वनपाल प्यारेलाल महाजन याला लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केल्याने जळगाव जिल्हा वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांचे मौजे तरवाडे ता. चाळीसगाव शिवारातील शेतात चंदन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासनामार्फत निधी मिळण्यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अर्ज केला असता त्यांचा अर्ज मंजुर होवुन त्यांचे वृक्ष लागवडी व संवर्धनासाठी प्रती वर्ष १,५०,०००/- रू. प्रमाणे तीन वर्षासाठी ४,५०,०००/- रू. मंजुर झाले होते. सदर वृक्ष लागवडीसाठी कुशल कामाचे खर्चाचे बिल सादर केले होते. सदर सादर केलेल्या देयकाचे ५०,०००/- रक्कमेचे बिल काढुन देणेसाठी वनपाल प्यारेलाल महाजन यांनी बिलाचे १५% टक्के प्रमाणे ७५००/-रुपयांची लाचेची मागणी पंच साक्षीदार यांचे समक्ष दिनांक २४/०६/२०२६ रोजी करून सदर मागणी केलेली ७,५००/- लाचेची रक्कम दिनांक २४/०६/२०२६ रोजी स्विकारतांना प्यारेलाल विठठ्ल महाजन, वय ५३ वर्षे, वनपाल, सामाजिक वनीकरण, परिक्षेत्र चाळीसगाव, जि. जळगाव याना रंगेहात अटक केली म्हणुन चाळीसगाव शहर पोलीस ठाणेस त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई सापळा अधिकारीः- पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सुर्यवंशी, ला.प्र.वि. नाशिक मो.क्र. सापळा पथकः- पो.हवा/विनोंद चौधरी, पो. कॉ/अनिल गांगोडे, पो. शि/योगेश शिंदे, तपास अधिकारीः- पोलीस निरीक्षक श्री. हेमंत नागरे, ला.प्र.वि. जळगाव मो.क्र. यांनी श्री भारत तांगडे, पोलीस अधीक्षक,माधव रेडडी, अपर पोलीस अधीक्षक. श्री. सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!