धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ; सावदा पोलिसांना निवेदन सादर
सावदा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज | दिल्ली येथील नाजिया इलाही खान यांनी कथितरित्या केलेल्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या व शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असून,सावदा शहरातील सुन्नी पंथीय मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी,रझवी ग्रुपचे सदस्य तसेच शहरातील सर्व मशिदींचे ट्रस्ट व पदाधिकारी यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे याबाबत दि.२४ जून रोजी निवेदन सादर केले.सदर घटनेचा निषेध केला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,इस्लाम धर्माचे पवित्र प्रेषित हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा(रजि.)यांच्या बद्दल कथित सदर महिलेने आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने संपूर्ण भारत देशासह जगातील मुस्लिम बांधवांची धार्मिक भावना दुखावल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे सपोनि.विशाल पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच सामाजिक सलोखा, शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने सदर घटनेची पार्श्वभूमीवर बघून आवश्यक ती कायदेशीर पावले तातडीने उचलावीत,अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी कादिर हाजी,इरफान शेख लुकमान,नाजिम भाई,पत्रकार युसूफ शाह,फरीद शेख,अजहर खान,मुख्तार भाई,अज्जू भाई. शेरा भैया, बाबू मेंबर,कालीम जनाब,निसार अहमद, कमरुद्दीन भाई,आबिद मोमीन,वसीम शेरा,रमजान भाई,सैयद सोनू ,नवीद खान,कलीम भाई, दानिश खान यांच्यासह मुस्लिम समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मशिदींचे ट्रस्टी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


