सावदा शहरात कडकडीत बंद, बांग्लादेशातील अत्याचाराच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद !
सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क |बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि.१६ ऑगस्ट) जळगाव जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून या बंदला लहान-मोठ्या व्यावसायिकांनी पाठिंबा देऊन आपला प्रतिसाद दिल्याने बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.
बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे जळगाव जिल्ह्यात बंद ची हाक देण्यात आली. त्या नुसार हिंदू अल्पसंख्याक कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत सावदा शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. आज शुक्रवार रोजी सकाळ पासूनच शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.
सावदा शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला आणि बंदमध्ये सहभाग नोंदवला. शहरातील आठवडे बाजारांसह संभाजी चौक चावडी परिसर, इंदिरा गांधी चौक, रविवार पेठ, दुर्गामाता चौक, चांदणी चौक, मोठा आद, शिवाजी चौक, स्टेट बँक परिसर,बस स्थानक परिसरातील दुकाने व रावेर – यावल रोड वरील दुकाने उस्फुर्त बंद ठेवण्यात आले.मात्र अपवाद म्हणून बस स्थानक परिसरातील हायवे ला लागून असलेले कोचुर रोडवरील एक हॉटेल अर्ध शटर लाऊन सुरू होते.