मोठी बातमी : “कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा” यावल तालुक्यात… “श्री शिवमहापुराण” कथेच्या जागेची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
पाडळसे. ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील पाडळसे येथे १० मार्च ते १६ मार्च २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी निवडलेल्या जागेची पाहणी आज शासकीय यंत्रणेकडून करण्यात आली.
आज, १७ जुलै रोजी फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे. आणि यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर .यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी अकलुद/भोरटेक शिवारातील संभाव्य कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक रतन शेठ भोई. आणि विजय भोई. तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, विलास चौधरी , भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे कुटुंबनायक ललितकुमार पाटील, शासकीय अधिकाऱ्यांमध्ये महिला बालविकास अधिकारी अर्चना आठोळे. फैजपूरचे उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील, सहाय्यक अभियंता दीपक पाटील , सहाय्यक अभियंता संदीप पाटील , सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावलचे अभियंता तडवी. यावल पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख, फैजपूर पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, ए.एस.आय. विजय चौधरी, राहुल नावकर, यावल एस.टी. आगार प्रमुख दिलीप महाजन, पाडळसे ग्रामपंचायत अधिकारी विद्या सूर्यवंशी, पाडळसे महसूल अधिकारी अंजली इंगळे, अकलुद महसूल अधिकारी मंजुषा पाटील आणि पाडळसे पोलीस पाटील सुरेश खैरनार आदी उपस्थित होते.
या व्यतिरिक्त, ग्रामपंचायत सदस्य पूनम पाटील आणि किरण तायडे , तसेच भाजपा कार्यकर्ते प्रकाश कचरे,यशवंत चौधरी, नितीन तायडे, योगेश पाटील, अरविंद पाटील, भरत चौधरी, शेखर तायडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. या पाहणीदरम्यान कार्यक्रमाच्या नियोजनाशी संबंधित विविध पैलू, आवश्यक सोयीसुविधा आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


