रोहिणी खडसे यांच्या प्रयत्नांना यश; संजय गांधी निराधार व विविध योजनांचे प्रलंबित प्रकरण मंजूर
Monday To Monday News Network
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | तालुक्यांतील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजना या विविध योजनांची प्रलंबित प्रकरण राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासना तर्फे समाजातील विधवा,परितक्ता, दिव्यांग, वयोवृध्द,निराधार या गोरगरीब घटकांना चरितार्थ चालवण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजना या विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा मानधन दिले जाते त्यासाठी लाभार्थ्यांना योग्य त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो तालुका स्तरीय संजय गांधी निराधार योजना समिती यातील पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देत असते त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मानधन मिळणे सुरू होते परंतु मुक्ताईनगर तहसील अंतर्गत सन 2023 मधील या योजनांचे पात्र प्रकरणे मंजुर करून निकाली काढण्यात आले होते
परंतु सन 2022 ते 2023 या वर्षात लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे सादर केलेले 1200 प्रकरण तहसील कार्यालयाकडे मंजुरी अभावी प्रलंबित पडून होते लाभार्थ्यांनाआपले प्रकरण नामंजूर किवा त्रुटी निघाली याबाबत कोणतीच माहिती दिली जात नव्हती सदर लाभार्थ्यांचे प्रकरण निकाली न काढल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते हि बाब लाभार्थ्यांनी रोहिणी खडसे यांच्या निदर्शनास आणुन दिली होती त्यावर रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दि 6 जुन रोजी मुक्ताईनगर तहसीलदार यांना हे सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याविषयी निवेदनाद्वारे विनंती केली होती अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता
विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी सुद्धा तहसिल कार्यालयात भुसावळ प्रांताधिकारी,मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत या योजनांचे प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्या बाबत तालुका प्रशासनाला निर्देश दिले होते त्यानुसार प्रलंबित 1200 पैकी 899 प्रकरणांना मंजुरी मिळाली असून त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रकरण मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी बँकेच्या पासबुक, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत ,दोन पासपोर्ट फोटो मोबाईल नंबर सह तहसिल कार्यालयात जमा करावे काही अडचण आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय किंवा पदाधिकाऱ्यां सोबत संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी केले आहे प्रलंबित प्रकरणाना मंजुरी मिळाल्या बद्दल लाभार्थ्यांनी आ एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत