IND vs PAK T20 : पाकिस्तानवर भारताचा विराट विजय; भारतीयांना दिवाळी गिफ्ट
मेलबर्न, वृत्तसेवा : भारताने अखेर गेल्या वर्ल्डकपमधील पराभवा दुबईतील पराभवाचे उट्टे मेलबर्नमध्ये लाखभर प्रेक्षकांच्या साक्षीने काढले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संवपला.
नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली. विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 ला 6 धावा असा आणला. पुढचा चेंडू नवाझने वाईड टाकला त्यामुळे सामना 3 चेंडूत 5 धावा असा होता. नवाझने विराटला बोल्ड केले मात्र नो बॉल असल्याने सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. स्ट्राईकवर असलेल्या दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाजने वाईड टाकत सामना भारताच्या खिशात टाकला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजय साकारला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली.