वसुली संदर्भात ठोस कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा– ZP सदस्यांची मागणी
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : जिल्हा परिषद स्थायी समितीची सानेगुरुजी सभागृहात ऑफलाईन झालेल्या सभेत वसुलीसंदर्भात ठोस कार्यवाही न करणाऱ्या अधिकार्यांचा गोपनिय अहवाल मागवून सीईओंनी त्यांच्यावर कारवाई करावी’ अशी मागणी करत समिती सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा शुक्रवार, दि.४ फेब्रुवारी रोजी सानेगुरुजी सभागृहात ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली. या सभेत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली डीव्हीडीएफचे ३० कोटी, पाणी पुरवठ्याचे २६ कोटी, जि.प.गाळ्यांचे १५ कोटी अशी जिल्हा परिषदेची ७१ कोटींची थकबाकी व व्याज असा एकूण शंभर कोटींवर आकडा गेला आहे. जिल्हा परिषदेचा बजेट १२ ते १५ कोयींवर जातोय. विविध विभागांच्या वसुलीसंदर्भात वेळोवेळी सदस्यांनी ठराव करुनही कार्यवाही केली जात नसल्याने जिल्हा परिषद कोमात जाण्याची भिती सदस्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेची मालमत्ता कोठे आहे, याविषयी अधिकारीच अनभिज्ञ आहे. ‘अंधेरी नगरी चौपट राजा’ असा जिल्हा परिषदेचा कारभार सुरु असल्याचा आरोप जि.प.सदस्य यांनी केला. सिंचन विहिरी व गोठाशेडची प्रकरणे काही तालुक्यात प्रलंबित आहेत. बिडिओंकडून टाळाटाळ केली जात आहे. तरीही बीडिओ,ग्रामसेवक आणि कार्यकारी अभियंत्यांकडून कोणतीही वसुलीसंदर्भात ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसून या संबंधित अधिकार्यांचा गोपनिय अहवाल मागवून सीईओंनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत करत आक्रमक झाले. यामुळे सीईओंनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आले.
तसेच जिल्ह्यतील सहा तालुक्यात जि.प.च्या प्राथमिक शाळांमध्ये सोलर पॅनल बसविण्यात आले असून त्यापैकी १० सुरु आहेत, तर ४२ सोलर पॅनल बंद अवस्थेत आहेत. या कामाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सीईओंनी तांत्रिक विभागाचे अभियंता मोरे यांच्याकडे चौकशी दिली. जि.प.आरोग्य विभागात औषध खरेदी प्रक्रिया रेंगाळल्यावरुन सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावर सीईओंनी टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर राबवून तातडीने औषधी खरेदी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. सदरील सभेस जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जि.प.समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्जवला म्हाळके, सीईओ डॉ.पंकज आशिया, उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार आदी उपस्थित होते.