भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

Breaking : पूर्णाड चेकपोस्टवर तीन तासापासून पथकाकडून चौकशी सुरू

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज अक्षय काठोके : पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवरील अवैध वसुलीच्या व टन काट्यातही झोल बाबत प्रकार आ. एकनाथराव खडसेंनी आरोप करत धक्कादायक प्रकार समोर आणल्यानंतर गेल्या ३ ते ४ तासापासून पथकाकडून चौकशी केली जात  आहे.

राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे यांनी ठेट विधानपरिषदेत पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवर प्रति वाहन २ हजारो रुपयाची वसुली केली जात असून दिवसाला १० ते १२ लाख रुपयांची माया गोळा केली असल्याची माहिती आ. एकनाथ खडसेंनी दिली होती वजन काट्यातही मोठी तफावत आढळून आली असल्याचे त्यांनी पेन ड्राईव्ह दिले होते या अवैध वसुलीमध्ये वर पासून साटेलोटे असल्याचे सांगत उद्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी खडसेंनी केली होती यामुळे गेल्या ३ ते ४ तासापासून पथकाकडून चौकशी केली जात आहे.

पूर्णाड चेकपोस्ट वरती सर्रास पणे अवैध गुरांची व ओव्हरलोड वाहतूक होत असून आर्थिक चिरीमिरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. यात आर टी ओ शी साडेलोटे असल्यानेच हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे समोर आले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!