क्राईमयावल

यावल जवळ भीषण अपघात, काकू – पुतण्याचा जागीच मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज २० मे २०२५ मंगळवार रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास यावल शहरापासून जवळच असलेल्या यावल- विरावली रस्त्यावर स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात काकू आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. कोरपावली येथील रहिवासी निशा जितेंद्र येवले आणि विशाल कुशल येवले (काकू-पुतण्या) हे दोघे या अपघातात मृत्युमुखी पडले. समोरून येणाऱ्या स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

यावल – विरावली रस्त्यावर तालुका कृषी कार्यालयाजवळ भीषण अपघाताची घटना घडली त्यात कोरपावली येथील निशा जितेंद्र येवले आणि विशाल कुशल येवले हे दोघं काकु पुतण्या एम.पी.०७ एन पी ३०७२ या दुचाकीवरून यावलच्या दिशेने जात असताना, कृषी फलोत्पादन केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या एमएच १९ जे ७१९८ या स्कूल बसची जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

विशाल कुशल येवले हा डीएच जैन विद्यालयातील विद्यार्थी असून तो नुकताच ६०% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला होता. अपघाताचे ठिकाण हे खड्डेमय आणि वळणाचे असल्याने वाहन चालकांचा ताबा सुटण्याची शक्यता असून, यामुळेच ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच यावल आणि विरावली गावातील नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.येवले कुटुंबातील दोन सदस्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरपावली गावात शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील खड्डे आणि वळण यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!