यावल तालुक्यातील “तो ” पोलिस पाटील अखेर निलंबित
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील पोलीस पाटलाने एका ३३ वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याचा विनयभंग केला होता. या संदर्भात फैजपूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस पाटलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नुसार फैजपूर प्रांताधिकारी यांनी त्या पोलिस पाटलावर अखेर निलंबनाची कारवाई केली.
यावल तालुक्यातील बामणोद – अकलूद रस्त्यादरम्यान यावल तालुक्यातील भोरटेक, येथील पोलीस पाटील धनराज गोंडू कोळी यांनी ३३ वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी शासकीय काम करत असतांना १३ फेब्रुवारी २०२५ पासून ते ७ एप्रिल २०२५ या कालावधी दरम्यान अटकाव करून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा पोलीस पाटलाविरुद्ध ३३ वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासंदर्भात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी पोलिस पाटलाचा निलंबनाचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्या नुसार प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी पोलिस पाटील धनराज गोंडू कोळी यांना निलंबित केले आहे. गुन्ह्याचा तपास साहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार मोती पवार करीत आहेत.


