यावलसामाजिक

पाडळसे येथील श्री खंडेराव देवस्थानचा १६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

पाडळसे, ता. यावल, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l यावल तालुक्यातील पाडळसे येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव महाराज देवस्थानचा १६ वा वर्धापन दिन दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी महापूजा, अभिषेक व आरती होणार असून, दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येईल. यावेळी गावातील आणि परिसरातील श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

श्री खंडेराव महाराज देवस्थानच्या वतीने भाविक भक्तांना या वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!