रावेरसामाजिक

सावाद्यात “श्री” च्या मिरवणुकीत झळकली “हिंदू राष्ट्र” चे बॅनर

सावदा, ता. रावेर.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” , च्या जल्लोषाने परिसर दुमदुमून सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते. गणपती मंडळांचे श्री विसर्जन मिरवणूक बुधवार अनंत चतुर्दशी रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात आली.

श्री विसर्जन मिरवणुकीत “हिंदू राष्ट्र” व “अखंड भारत” चे बॅनर झळकवण्यात आलीं. हिंदू राष्ट्र च्या बॅनर ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शहरातील मंडळांनी दुपारी दोन वाजे नंतर श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली. पारंपरिक वाद्या सह बॅन्ड, लेझिम आदी वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. त्यात बँड वाज्याच्या तालावर तरुणाई थिरकतांना दिसून आली.

मिरवणूक रविवार पेठ – शिवाजी चौक – संभाजी चौक – चांदणी चौक – गांधी चौक – गावात बाजार मार्गे शारदा चौक – माळी वाडा – रविवार पेठ मार्गे नगिना  – शिवाजी चौक – वंजारवाडी – मोठा आड – पाटील पुरा – इंदिरा गांधी चौक – मुख्यारस्ता मार्गे चावडी चौक गांधी चौक मार्गे स्टेशन नाका मार्गे हतनूर धरणावर तापी नदी त श्री चे विसर्जन करण्यात आले. काही मंडळांनी मुक्ताई नगर तालुक्यातील तापी पूर्णा संगमावर श्री चे विसर्जन केले.

विसर्जन मिरवणुकीत संभाजी चौक येथे फराळाचे आयोजन अकोले बंधुंकडून आयोजित करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.

लाडक्या बाप्पाला निरोप देताना , भाविक भक्तांनी भरभरून आनंद लुटला. शांततेत व भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. मिरवणुकीत सावदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!