तापी परिसरात जाळ्यात अडकलेल्या “त्या” बिबट्याच्या मृत्यूने खळबळ
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रानटी डुकरे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकून पडल्याची घटना आज सकाळीच रावेर तालुक्यातील सुदगाव येथे एका शेतकऱ्या च्या निदर्शनास आल्याने उघडकीस आली.प्रथम दर्शि बघितलेल्या व्यक्तीने सदर बिबट्या जाळ्यात अडकलेल्या स्थितीत बघितला त्या वेळेस बिबट्या जिवंत होता. मात्र त्याच्या गळ्याला जाळ्याचा फास लागल्याने त्याचा आवाज निघत नव्हता. दुर्दैवाने अखेर त्या बिबट्याचा मृत्यू झाला.या घटनेने परिसरात खळबळ उडाली.वन्यजीव संरक्षण आणि बेकायदेशीर जाळ्यांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रावेर तालुक्यातील सूदगाव शेत शिवारात काही अज्ञात व्यक्तींनी रानडुकरां पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा नर जातीचा, सुमारे ३७ किलो वजनाचा बिबट्या अडकला.बिबट्या रात्री पासून जाळ्यात अडकला असावा. आणि त्या वेळे पासून त्याला अन्न व पाण्याअभावी, तीव्र ताण, दमछाक आणि गंभीर जखमा त्यातल्या त्यात त्याच्या गळ्याला फास लागल्याने त्याचा आवाजही निघत नव्हता.यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
बिबट्या जाळ्यात अडकल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली.आणि बघ्यांची गर्दी होऊ लागली.याची माहिती पोलिस प्रशासन व वन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. व बिबट्याला तेथून सोडविण्यासाठी रेस्क्यू सुरू झाले. मात्र अन्न पाण्या विना व जाळ्यातून बाहेर निघण्याच्या धडपडीत त्याच्या गळ्याला फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडण्यात आली पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृत बिबटाचे व्हिसेरा नमुने गोळा करून ते सिलबंद करण्यात आले आहेत. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार सदर बिबट्याचा मृत्यू डीहायड्रेशन (निर्जलीकरण) तसेच हिट स्ट्रोकमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याची माहिती पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दिली.
यासंदर्भात अज्ञात व्यक्ती विरुद्ध वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशी जाळे लावणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी अशी वन्यप्रेमिंकडूनं मागणी करण्यात येत आहे.


