भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार ; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मंत्रीमंडळाने नगराध्यक्षा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणूनही विजयी झालेली असेल तर तिची दोन्ही पदे कायम राहतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून मत देण्याचा अधिकार असेल. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला जाईल.

एखादी व्यक्ती थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली असेल व त्याचवेळी एखाद्या वॉर्डातून ती नगरसेवक म्हणूनही विजयी झाली असेल आणि नगराध्यक्ष म्हणून तिच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तरी ती नगरसेवक म्हणून कायम राहील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!