भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

चिनावल शिवारात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ,खून की आत्महत्या? चर्चांना उधाण

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| रावेर तालुक्यातील चिनावल शिवारात एका विहिरीत बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खून का आत्महत्या? या बाबत अनेक तर्क वितर्क मांडले जात आहेत. ही घटना सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली

अधिक वृत्त असे की, रावेर तालुक्यातील चिनावल शिवारातील कुंभारखेडा रोडवरील निखिल पितांबर भारंबे यांच्या शेतातील विहिरीमध्ये एक मृतदेह तरंगत असताना सापडला. त्या मृतदेहाची ओळख पटली असता तो गेल्या सहा ते सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिनावल येथील समीर सुराज तडवी (वय ३० वर्ष.) याचा मृतदेह असल्याचे समोर आले.

गेल्या ९ तारखेपासून बेपत्ता असलेल्या समीर तडवी याचा मृतदेह सहा ते सात दिवसानंतर विहिरीत सापडल्याने खून की आत्महत्या ? या बाबत परिसरात मोठी चर्चा असून या संदर्भात सावदा पोलिस तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!