भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

आई- वडिलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लाऊन दिला, ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जिल्ह्यातून एक धक्कादायक व संतापजनक घटना उघडकीस आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ १ लाख ७० हजार रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या आई-वडिलांनीच नातेवाईकांच्या मदतीने आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी अवघ्या १४ वर्षांची असून ती अल्पवयीन आहे हे माहित असतानाही आई वडील व इतर नातेवाईकांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी मुलीचे १८ वर्ष वय असल्याचे खोटे सांगून जळगाव येथील सीता सोनू नगर मधील रहिवासी आरोपी संशयित गणेश दत्तू काथार याच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले. ही रक्कम स्वीकारून त्यांनी पीडितेचे लग्न गणेश काथार याच्याशी लावून दिले.

लग्न लावून दिल्यानंतर पीडितेचे नातेवाईक तिला आरोपी गणेशच्या घरी सोडून निघून गेले. पीडितेचे वय १८ वर्षे पूर्ण असल्याच्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवून, कोणतीही खात्री न करता आरोपी गणेश काथार याने पीडितेवर वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ५ फेब्रुवारी रोजी कन्हैयालाल चुनीलाल पटेल (वडील), संगीता कन्हैयालाल पटेल (आई), कविता पटेल (बहीण), पूनम वर्मा (आत्या), राणीताई किन्नर (रा. उधना, गुजरात), मनिषा संजय जैन ७) गणेश दत्तू काथार (वर/पती) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!