सावाद्यात पाणी व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर, मूलभूत सोयी सुविधांचा अभाव, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठी मागील पवन नगर, निमजाई माता नगर आणि स्वामी समर्थ कॉलनी परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत.
साफसफाई, झाडू मारणे, पिण्याच्या पाण्याची अनियमितता, गटारींमधील अस्वच्छता, कित्येक दिवस गटारी न काढणे, त्या मुळे गटारी व तुडुंब भरल्याने डासांचा सुळसुळाट वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच खराब रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले असून आदी समस्या घेऊन ५० ते ६० संतप्त महिला व पुरुष रहिवाशांनी सावदा नगरपालिकेवर धडक देत अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पहायाला मिळाले. या घटनेनं गोंधळ उडाला.
अमृत योजनेतून नुकत्याच झालेल्या नवीन पाईपलाईनच्या कामावरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. नवीन पाईपलाईन टाकूनही परिसरात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक ठिकाणी तर पाणी येणेच बंद झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागून पाण्याची वाट पाहावी लागत आहे, असा आरोप करत अमृत योजना पूर्णपणे फेल गेल्याची ओरड संतप्त नागरिक करीत आहेत.
जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून लहान मुले आणि वृद्धांमध्ये आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. वारंवार तक्रार करूनही नगरपालिके कडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
वेळोवेळी नगरपालिकेकडे आम्ही अर्ज केले तोंडी सांगितले तरी आज पावतो कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. निवेदन देते वेळी दीपक लोमटे, अजय चौधरी, दिलीप चौधरी, लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील, विशाल चौधरी, अनीता चौधरी, अंजली लोमटे, दिपली वाघूळदे, गेंदरज वाघुळदे, पंकज पाटील, परमिळ जावळे, संदीप राणे, तसेच समस्त रहिवासी उपस्थित होते.