भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

दहावी बोर्ड परीक्षा फॉर्म भरण्याबाबत शिक्षण मंडळाची मोठी घोषणा, प्रक्रिया सुरू….

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नियमित शुल्क भरून १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहे. दहावी परीक्षेचे अर्ज हे केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फतच अर्ज सादर करावेत, असे मंडळाने स्पष्ट केले.

ही अर्ज प्रक्रिया नियमित विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया ‘यूडायस प्लस’मधील पेनआयडी वरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत केली जाणार आहे, तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्यांचे अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर ( www.mahahsscboard.in )
उपलब्ध होतील. हे अर्जही शाळाप्रमुखांमार्फत भरायचे आहेत. परीक्षा शुल्काचा भरणा आरटीजीएस/एनईएफटी याद्वारे करावा लागणार आहे. त्याची पावती, चलन आणि विद्यार्थ्यांची यादी निर्धारित तारखेला सादर करावी लागेल.

शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’मध्ये आवश्यक माहिती भरणे अनिवार्य आहे. यात शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षकांची माहिती समाविष्ट आहे. ही माहिती भरल्यानंतर मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज शाळेमार्फतच ऑनलाइन भरावेत, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!