महाराष्ट्रशैक्षणिक

प्रतिक्षा संपली, 13 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चन माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालाची प्रतिक्षा आता संपली असून बारावी पाठोपाठ दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

बारावीचा निकाल लागल्यानंतर बहुप्रतीक्षित अशा दहावीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. आता दहावी परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली होती. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात त्यासाठी 5 हजार 130 मुख्य परीक्षा केंद्र होते. राज्यातून या परीक्षेला 16.11 लाख विद्यार्थ्या बसले होते. त्यात 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली होत्या.

महाबोर्ड एसएससी निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in आणि mahahsscboard.in

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!